पश्चिम रेल्वेवर 194 लोकलच्या फेर्या वाढणार

मुंबई : शिथीलकरणामध्ये लोकल पुर्णक्षमतेने सुरु झाली नसली तरी हळूहळू लोकलच्या फेर्या वाढविल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेवर 15 ऑक्टोबरपासून 194 लोकलच्या फेर्या वाढवण्यात येत आहेत. सध्या पश्चिम रेल्वे वर 506 लोकलच्या फेर्या सुरू आहेत. त्यामुळे एकूण 700 फेर्या होणार आहेत. 194 पैकी 10 फेर्या या ए सी लोकलच्या असणार आहेत. लोकलमधील गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली एसी लोकल सेवा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. 15 ऑक्टोबरपासून एकूण 194 लोकल फेर्यांची भर पडणार आहे. यामध्ये सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेर्यांचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलच्या महालक्ष्मी ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट अशा दोन फेर्या धिम्या मार्गावर होतील. तर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा अप-डाऊन मार्गावर मिळून आठ जलद लोकल फेर्या होणार आहेत.
सध्या पश्चिम रेल्वेवर 506 लोकल फेर्या होत होत्या. नवीन फेर्यांची भर पडणार असल्याचे एकूण फेर्यांची संख्या 700 होणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेही फेर्या वाढवणार आहे. होणारी गर्दी पाहता उच्च न्यायालयाने फेर्यांची संख्या प्रत्येकी 700पर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पश्चिम रेल्वेने नवीन फेर्यांची भर पाडताना मध्य रेल्वेनेही लोकल फेर्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दरदिवशी 453 फेर्या मध्य रेल्वेवर होतात. या फेर्या आणखी 700 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, डेक्कन क्वीनचा मावळच्या मध्यवर्ती परिसरात कोणताच थांबा नसल्याने मुंबईसाठी प्रवास करणार्या नागरिकांना या ट्रेनने प्रवास करण्यासाठी पुणे स्टेशन किंवा लोणावळा गाठावे लागते. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून या ट्रेनचा थांबा मावळ किंवा पिंपरी चिंचवड परिसरात करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.