आत्मसंगिनी मीरा

मीरा के बोल
बालपणी कोणी साधु कृष्ण मूर्ति देऊनी गेला
निरखून पाही मीरा, सापडला कृष्ण मला
भेटला तो प्राणसखा मीरा गेली हरवुन
कृष्ण माझा श्वास असे,जाऊ नकोस सोडुनं
सौभाग्य हेच कृष्ण कशासाठी स्वयंवर
प्रेम तिचे त्याचावर मनी नाही दुजा वर
नाते कुटुंब सारे, एकटीला सोडुन गेले
मीरे साठी फक्त कृष्ण, सगेसोयरे वैरी झाले..
स्वर्गी ऐकू येेई कृष्ण जप, देव परीवार म्हणे सारा
कृष्णा, किती वाट पाहे जन्मोजन्मी तुझी मीरा
बदनामी आली पदरी लांछन सारे आले
त्याग कृष्ण सोड त्याला मीरे साठी हुकुम आले...
हृदय माझे येथेच मी कशी जाऊ
प्राण गेले जरी कृष्ण विना मी कशी राहु
विष आले वाटेला म्हणे मीरा प्रेमाने
कृष्णा भेटशील ना रे? मूर्ती तिची हादरे ..
धन्य झाले विष ते, विष झाले प्रेममय
मीरा झाली कृष्ण नीळी देह झाला कृष्णलय
चिंब झाली कृष्ण मूर्ती ढाळी कान्हा अश्रू नीळे
ओवाळून जीव ऐसे कोणी प्रेम कधी का करे...
कृष्ण म्हणे माझ्रासाठी
मीरा नाम हेच प्रेम
मीरा हेच कृष्ण नाम
जरी राधा प्राणसखी
मीरा असे आत्मसंगिनी ....
- मिरा पितळे