Breaking News
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘कारखाना बंदी’ नोटीस
तळोजा : तळोजा एमआयडीसी परिसरामधील प्रदूषणामध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून काहींना कारखांना बंदीची नोटीस पाठवली आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने बंद असताना तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. परंतु आता अनलॉकनंतर कारखाने सुरू झाल्यानंतर प्रदूषणात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यापूर्वी चार कारखान्यांवर कारवाई करण्यात आली असून आता आणखी आठ कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत. चार कारखान्यांना कारखाने बंद करण्यासंदर्भात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय एका कारखान्यासाठी प्रस्तावित आदेश देण्यात आले असून दोन कारखान्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पडघे गावाशेजारील नदीकाठी रासायनिक कचर्यावर प्रक्रिया करणार्या कारखानदाराने घातक रासायनिक कचरा मोकळ्या जागेवरच टाकला होता. याप्रकरणी संबंधित मालकावर कारवाई करण्यात आली असून सदर रासायनिक कचर्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कारवाई संदर्भात नागरीकांनी आभार व्यक्त केले असून कारवाही इथेच न थांबविता तळोजा एमआयडीसी व इतर औदयोगिक क्षेत्रांत सुद्धा चालू ठेवून अशा कंपनीच्या मुजोरीवर नियंत्रण ठेवावे अशी विनंती केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai