भाज्यांच्या दरात घसरण

नवी मुंबई : गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने दमदारी हजेरी लावून पिकांचे नुकसान केले होते. परिणामी बाजारात आवक कमी असल्याने भाजीपाल्यांच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र घाऊक बाजारात आता भाज्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण होत आहे.

भाज्यांचे दर हे पुन्हा स्थिर झाले आहेत. पुणे, नाशिक, अहमदनगर, कर्नाटक, गुजरात, जळगाव, लातूर या सर्व ठिकाणांहून गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 19 ऑक्टोबरला एपीएमसीत 627 गाड्यांची आवक झाली.  मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. जवळपास 8 महिन्यांनंतर एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 627 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, आता भाज्यांच्या किंमतीत जी घसरण झाली आहे ती दिवाळीपर्यंत तशीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

किलोमागे भाज्यांचे दर 

वांगी ः 35 ते40 रु.
गवार : 60 ते 70 रु 
कोबी : 20 ते 30 रु 
फ्लॉवर ः 25 ते 30 रु. 
काकडी : 20 ते 25 रु 
मिरची : 35 ते 45 रु 
शिमला मिरची : 40 ते 60 रु 
भेंडी : 25 ते 35 रु 
फरसबी : 45 ते 55 रु 
शेवगा : 50 ते 60 रु 
रताळे : 25 ते 30 रु 
कोथिंबीर : 40 ते 60 जुडी
मेथी : 15 ते 25 जुडी
वाटाणा : 100 ते 140 रु 
टोमॅटो : 20 ते 30 रु