राज्यात मास्कची किमंत निश्चित

मुंबई : कोरोना काळात हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क यांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा भूर्दंड सामान्यांना सोसावा लागत होता. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता शासनाने एका समितीची स्थापना केली होती. त्यानुसार राज्यात मास्कची किमत आता निश्चित करण्यात आली आहे. मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.
मास्क, सॅनिटायझर यांच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं निदर्शनात आलं होतं. केंद्र शासनाच्या किमतीवरील नियंत्रणही 30 जून 2020 नंतर संपुष्टात आलं होतं. मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण यावे व सर्वसामान्यांना किफायतशीर किमंतीत मास्क मिळावे यासाठी शासनाने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने मास्क उत्पादक कंपन्यांचा सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्चित केल्या आहेत. यावरून उत्पादकाची उत्पाद किंमत, त्यावरील नफा तसेच प्रत्येकी वितरक व विक्रेता यांचा नफा गृहीत धरुन समितीने दर्जानुसार मास्कचे अधिकतम विक्री मुल्य प्रस्तावित केल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार राज्यात मास्कची (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता राज्यात मास्कची किंमत 19 रुपये ते 127 रुपये असणार आहे.
मास्कची किमत