Breaking News
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयएनएस वागीर पाणबुडीचे उद्घाटन
मुंबई : आयएनएस वागीर ही नवीन शक्तिशाली पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या पाणबुडीच्या आगमनाने भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डर्सने ही पाणबुडी गुरुवारी नौदलाकडे सुपूर्द केली. तत्पूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गोवा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वागीर पाणबुडीचे उद्घाटन केले.
पाचव्या श्रेणीची पाणबुडी ‘आयएनएस वागीर’ गुरुवारी दक्षिण मुंबईतील माझगाव डॉक येथे आयएनएस वजीर समुद्रात सोडण्यात आली. या पाणबुडी शत्रूच्या रडारवर येऊ शकत नाही, यासाठी तिच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आयएनएस वागीर विषयी माहिती देताना नौदलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे, युद्धामध्ये ती प्रभावी ठरणार आहे. ती समुद्रात सुरुंग ठेवण्यास आणि देखरेख करण्यासाठी देखील ती सक्षम आहे. तर माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीएल) या कामाबाबत सांगितले की, स्कॉर्पेन पाणबुड्यांचे बांधकाम एमडीएलसाठी आव्हानात्मक होते. कारण कमी जागेत कामकाज सहज झाल्याने ते आव्हानात्मक बनले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai