तेल कंपनीच्रा पाईपलाईनमधून इंधन चोरी करणारी टोळी जेरबंद

नवी मुंबई : एचपीसीएल कंपनीच्रा पाईपलाईनला छिद्र करुन  टँकरमधून डिझेल चोरीचा प्रकार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. टोळीतील चौघांना अटक केली आहे. तसेच या टोळीकडून डिझेल विकत घेणा़र्‍या बुलढाणा येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजरला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सुमारे सव्वा तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  केला आहे. 

पुणे ते मुंबई दरम्रान एचपीसीएल कंपनीची वाहिनी असून राद्वारे डिझेलचा पुरवठा होतो. सप्टेंबर महिन्रात कमी दाबाने डिझेल मिळत असल्राची तक्रार पुणे कार्रालराने मुंबई कार्रालरात केली होती. मात्र पुरवठा व्रवस्थित होत असताना कमी दाबाने पुरवठा का होत आहे राबाबत तपास सुरू होता.  त्रा अनुषंगाने कंपनीने आपली गस्ती पथकेही पाठवून शोध घेतला.  रात सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत तुर्भे उड्डाणपुलानजीक डिझेल चोरी होत असल्राचे समोर आले. त्रानंतर रा प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्रात तक्रार देण्रात आली होती. पोलिसांनी सापळा रचला. मात्र त्रात त्रांना रश आले नाही. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली असता, या डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी भोलाप्रसाद यादव याला तुर्भे येथून ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता, त्याने बलदेव सिंग, जितेंद्र उर्फ जितुभाई यादव, केशव शेट्टी या तिन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना सानपाडा हायवे ब्रिज जवळून ताब्यात घेतले.