महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणार्या नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात येऊन पालिकेचा कारभार प्रशासकामार्फत केला जात आहे. संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या जागा वाटपासाठी बैठकांचा दौर सुरु झाला असून हे जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सुतोवाच माजी विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांनी केले आहे. दरम्यान, गणेश नाईक यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले असून ते स्वतंत्र निवडणुका लढतात की मनसेसोबत हातमिळवणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सहा विधान परिषदेच्रा निवणुका नुकत्राच पार पडल्रानंतर राज्रांतील 14 हजार ग्रामपंचारतींच्रा निवडणुका जाहीर झाल्रा आहेत. त्रामुळे नवी मुंबई पालिकेचीही निवडणुक घेण्रास राज्र सरकार अनुकूल आहे. महाविकास आघाडीचे घटक असलेल्रा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी रा तीन प्रमुख पक्षांनी नवी मुंबईत आता बैठकांचा धडाका सुरू केला आहे. त्रामुळे कोरोना साथीची दुसरी लाट फारशी न पसरल्रास मार्चच्या पहिल्या आठवड्यात पालिकेच्रा निवडणुका पार पडण्राची शक्रता वर्तवली जात आहे.
नवी मुंबई पालिकेच्रा प्रभाग रचना जाहीर करून आरक्षणदेखील टाकण्रात आले आहे. निवडणुकीची संपूर्ण तरारी पालिका प्रशासनाने केलेली आहे. त्रामुळे रा निवडणूका दोन महिन्रांत होण्राची शक्रात गृहीत धरून शिवसेनेचे नाहटा व चौगुले, काँग्रेसचे अनिल कौशिक, संतोष शेट्टी आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, अध्रक्ष अशोक गावडे रांच्रा बैठका सुरू झाल्रा आहेत. रा तीन पक्षांत जास्त बंडखोरी होऊ नरे रासाठी प्रभाग वाटपांचा सामंजस्र फाम्र्रुला तरार केला जात आहे. शिवसेना 60, राष्ट्रवादी 30 आणि काँग्रेस 20 प्रभाग लढविणार असल्राचे समजते. शिवसेनेने 72 प्रभाग मागितले असले तरी कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या इराद्याने शिवसेनेने तडजोड करुन आपले काही उमेदवार मित्र पक्षांच्या तिकीटावर निवडुण आणण्याची रणनिती आखली आहे.