Breaking News
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
महत्वाकांक्षी प्रकल्प असणार्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नगरविकास मंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. राज्यात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुसदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला उत्तूंग झेप घेता यावी यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे म्हणजे त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. असे नामकरण करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी विनंतीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai