4 विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प्राप्त

नवी मुंबई ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील 4 विद्यार्थ्यांना महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनव्दारे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असून महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील दहावी बोर्ड परीक्षेच्या उल्लेखनीय निकालाप्रमाणेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.सुमीत मोहन तायडे, मनपा शाळा क्र.  42 घणसोली  (गुण 216 टक्केवारी 72.48), कु.सोनल शैलेंद्र खेडकर, मनपा शाळा क्र. 42 घणसोली (गुण 210, टक्केवारी 70.46), कु.अविशा तुकाराम जापनकर, शाळा क्र. 55, कातकरीपाडा (गुण 186, टक्केवारी 62.41), कु.अथर्व मोहन सणस, मनपा शाळा क्र. 42 घणसोली  (गुण 180, टक्केवारी 60.40) या 4 विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक वाढविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या यशाबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव व शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्या उपस्थितीत, त्यांना मार्गदर्शन करणार्‍या मुख्याध्यापक, शिक्षकांचेही अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.