कराटे चॅम्पीयनशीपमध्ये चमकले नवी मुंबईचे तारे

नवी मुंबई : शोतोकॉन कराटे डु.फेडरेशन इंडिपेन्डस कप मुलुंड येथे 12 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या ओपन कराटे चॅम्पीयनशीप  मध्ये नवी मुंबईतील गोल्डन डायमंड मार्शल आर्टस अ‍ॅकडमीच्या विदयार्थानीं 9 सुवर्ण, 5 रौप्य व 9 कांस्यपदक प्राप्त करून प्रथम क्रंमाकाची ग्रॅन्ड चॅम्पीयनशीप मिळवुन नवी मुंबईचे स्थान उंचावले आहे. 

या स्पर्धेत 350 विदयार्थान सह श्रीलंका या देशाने ही सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील पदक प्राप्त खेळांडुची नावे पुढील प्रमाणे : सुवर्ण पदक विजेते - अबीर चॅटर्जी (8 वर्षाखालील), प्रणव पुजारी (10 वर्षाखालील), अथर्व वाबळे (11 वर्षाखालील), यश उतेकर (12 वर्षाखालील) स्वरूप  सुपल (14 वर्षाखालील), मानव शिंदे (9 वर्षाखालील), उर्मिला कुमार (9 वर्षाखालील), सोहम सरवणकर  (ब्लॅक बेल्ट 15 वर्षाखालील), यांनी सुवर्णपदक पटकावले. तर शैप्य पदक प्राप्त करणार्‍यामध्ये सानिया धराडे (12 वर्षाखालील), कायनात पावणे (10 वर्षाखालील), सात्विक कढणे (6 वर्षाखालील), सुशांत पालवे (13 वर्षाखालील) सुयश कुमार (13 वर्षाखालील) तसेच कास्य पदक प्राप्त आदित्य चव्हाण 11 वर्षाखालील), प्रणिमा भोसले (9 वर्षाखालील), कृष्ण यादव (8 वर्षाखालील), हर्षद ब्राम्हणे (13 वर्षाखालील), प्रितम निकम (10 वर्षाखालील), समर्थ खामकर (10 वर्षाखालील), सिद्धेश सरवणकर (ओपन ब्लॅक बेल्ट 16 वर्षाखालील), वरद कोष्टी (8 वर्षाखालील) श्‍लोक गुप्ता (13 वर्षाखालील) यांनी नवी मुंबईचे नाव उंचावले आहे हया विदयार्थानां अ‍ॅकडमीचे ग्रॅड मास्टर आप्पा चिकणे, शिहान शिवाजी ढवळे, सेन्साई महेश दाभाडे व शंकर शेलार आदि चे मार्गदर्शन लाभले आहे.