ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार

ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटिका ऍडव्होकेट संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कोपरखैरणे येथे झालेल्या पक्ष प्रवेशाच्या या कार्यक्रमास माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक दशरथ भगत, माजी नगरसेवक अशोक पाटील, परिवहन समितीचे सदस्य ऍडव्होकेट जब्बार खान, दिनेश पारख, माजी नगरसेवक संपत शेवाळे, राजेश मढवी, निशांत भगत, विजय मिश्रा, सुदर्शन जिरगे, जयेश कोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.