कोरोनाची दहशत ; डबेवाल्यांची सेवा 31 मार्चपर्यंत बंद

मुंबई : देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ही 168 वर पोहोचली आहे तर महाराष्ट्रात 47 रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आतापर्यंत एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. मुंबईचा सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 मार्च 2020 पासून ते 31 मार्च 2020 पर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट व मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाद्वारे घेण्यात आला आहे. त्याच प्रमाणे 1 एप्रिल 2020 पासून सेवा नियमितपणे सुरू राहील.