स्वच्छ रेडिओ नवी मुंबईचे दीड महिन्यात 21 हजारहून अधिक श्रोते

नवी मुंबई ः कोव्हीड-19 च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता सुरु करण्यात आलेल्या ‘स्वच्छ रेडिओ नवी मुंबई’ या अभिनव संकल्पनेला नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून 6 एप्रिल पासून सुरु झालेल्या या इंटरनेट रेडिओचे आजतागायत दीड महिन्यात 21 हजार 784 श्रोते झालेले आहेत. सध्या दररोज 1200 हून अधिक श्रोते या इंटरनेट रेडिओ श्रवणाचा लाभ घेऊन सद्यस्थिती जाणून घेत आहेत.

स्वत:चा इंटरनेट रेडिओ असणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असून या ’स्वच्छ रेडिओ नवी मुंबई’ वरून कोव्हीड-19 विषयी माहिती प्रसारणासोबतच विविध विषयांवरील कार्यक्रम सादर होत आहेत. यामध्ये, के.ई.एम. रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डीन व सुप्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर या कोरोना विरोधातील लढाईच्या काळात कोरोना बाधितांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मानसिक ताणतणावांपासून कसे दूर रहावे याविषयी मौलिक मार्गदर्शन करीत असतात. संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक घटकांच्या मानसिकतेचा विचार करून त्या सादर करीत असलेल्या व्याख्यानांवर अनेकांचे पसंतीपर अभिप्राय प्राप्त होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या व्याख्यानांमुळे मानसिक आधार मिळत असल्याची प्रतिक्रिया विशेषत्वाने महिलांकडून प्राप्त होत आहे.

सुप्रसिध्द लेखिका, गीतकार धनश्री देसाई यांच्या विविध विषयांवरील समुदेशनपर लेखांचे तसेच खास करून मुलांचे भावविश्‍व फुलविणार्‍या गोष्टींचे सादरीकरण या रेडिओवरून करण्यात येते. त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे विविध वृत्तांचे विशेष बुलेटीन, प्रेरणादायी कथा वाचन, कोरोना विषयावरील विशेष गीत प्रसारण तसेच इतर सुमधूर संगीताचे प्रसारण या रेडिओवरून केले जाते. याशिवाय साहित्य, संस्कृती, अशा विविध विषयांवरील माहिती रंजक पध्दतीने प्रसारित केली जात आहे.

रेडिओ वरील सर्वच कार्यक्रमांना नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बघता बघता दररोज 1200 पेक्षा अधिक श्रोत्यांची संख्या झालेली आहे. स्वच्छ रेडिओ नवी मुंबई ऐकण्यासाठी ुुु.ीुरलहहीरवळेपर्रींर्ळाीालरळ.लेा या संकेत स्थळाप्रमाणेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन स्वच्छ रेडिओ नवी मुंबई (डुरलहह ठरवळे छर्रींळ र्चीालरळ) हे प डाऊनलोड केल्यास नागरिक अगदी कुठेही या इंटरनेट रेडिओ सेवेचा लाभ घेऊ शकतात.