ऐरोलीत नवे कोविड सेंटर

आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्यास मुर्तरुप

 नवी मुंबई ः कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऐरोलीत नविन कोरोना सेंटर उभारण्यासाठी  आमदार गणेश नाईक सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यानुसार पालिकेने ऐरोलीतील सेक्टर 15 मध्ये असलेल्या लेवा पाटीदार सभागृहात नविन कोविड सेंटरची निर्मिती केली आहे.  या सेंटरची रविवारी आ.नाईक यांनी पाहणी करुन सकृतदर्शनी येथील व्यवस्था समाधानकारक असल्याची प्रतिक्रीया नोंदवली.

ऐरोली नोडमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. त्यादृष्टीने हे नविन कोविड सेंटर रुग्णांना अलगिकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. लेवा पाटीदार सभागृहाच्या तीन मजल्यांवर एकुण 302 खाटांचे हे सेेंटर असून त्याचे काम पुर्ण होत आले आहे. केवळ खाटा म्हणजे क्वारंटाईन सेंटर नसून त्यामधून उपचाराच्या व इतर आवश्यक चांगल्या सुविधा मिळणे अपेक्षित असल्याचे मत  आ.नाईक यांनी याप्रसंगी मांडले. ऐरोलीसह नवी मुंबईत कोविड बाधितांचे आकडे वाढत आहेत. यावर आपले निरिक्षण नोंदवताना ते म्हणाले, ‘नवी मुंबईकर समंजस आहेत. त्यांना या महामारीचे गांभीर्य कळते मात्र सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न लावणे, सॅनिटायझर न वापरणे काही घटकांच्या अशाप्रकारच्या  बेफिकरी वृत्तीमुळे या रोगाचा संसर्ग वाढतो आहे.‘ 

वाशीतील पालिकेचे कोविड रुग्णालय, सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड सेंटर यांना वेळोवेळी भेटी देवून  आ.नाईक यांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपयुक्त सुचना केल्या आहेत. 

या पाहणी दौर्याप्रसंगी माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक,माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती अनंत सुतार, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समितीचे सभापती नवीन गवते,दिनेश पारख,ऍड. जब्बार खान ,दीपक पाटील,सुदर्शन जिरंगे,कैलाश सुकाळे, ऍड. संध्या सावंत,अनिल नाकते,कैलाश गायकर,शिवाजी खोपडे, नरेंद्र कोटकर,भरत मढवी,बाबूलाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.