मराठा आरक्षणाला स्थगिती

मुंबई : मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना 2020-21 या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या असून यासंदर्भातच सरकारची पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. 

संध्याकाळी साडेसहा वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणारे आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य शासनाचे वकिल आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पुढील रणनितीवर चर्चा होणार आहे.