सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नवनियुक्ती

मुख्य दक्षता अधिकारी पदी एस. एच. महावरकर 

नवी मुंबई ः भारतीय प्रशासकीय सेवेतील एस. एस. पाटील व कैलास शिंदे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर एस. एच. महावरकर यांनी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

एस. एस. पाटील सन 2011 च्या तुकडीतील व कैलास शिंदे सन 2013 च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत तर एस. एच. महावरकर हे सन 2005 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. 

सिडको महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एस. एस. पाटील जिल्हा परिषद, अहमदनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते तर कैलास शिंदे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.एस. एच. महावरकर सिडकोतील मुख्य दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी नागपूर पोलिस आयुक्तालयामध्ये अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.