सबोर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2020
- 680
पनवेल : राज्यभरात कोरोनाने थैमान घातलेले असून त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा परिस्थितीतही महावितरणमधील सर्व अभियंते कोविड सेंटर/हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम जीव जोखमेत घालून करीत आहेत. मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असून त्यामुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सबोर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
शासनाने 15 टक्के बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरणने गए ते एए च्या एकही अभियंत्याची विनंती बदली आदेश काढलेला नाही. उलटपक्षी काही पदे रिक्त ठेवली आहेत. अनिवार्य रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा देतांना अडचणीचे ठरत आहे. तसेच दैनंदिन कामकाजातही अभियंत्यांवर अतिरिक्त ताण येत असून त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. महावितरण आधीच कठीण वित्तीय परीस्थितीतून जात असताना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्वाची प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे असे साबॉर्डीनेट अभियंता संघटनेने महावितरण प्रशासनाला वेळोवेळी सुचविले आहे. तसेच त्यावर उपायही सुचविले आहेत मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मात्र महावितरण प्रशासन बदली या विषयावर विनाकारण वेळ वाया घालत असून संपूर्ण महाराष्ट्रातील सबोर्डीनेट इंजिनीयर्स असोसिएशनचे अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. याबाबत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री मा डॉ नितीन राऊत यांना भेटून निवेदन दिले असून सदर प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा नाही काढला तर निषेध आंदोलन चालु करण्याचा विचारात संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीनही कंपनीचे अभियंते कोविड परिस्थितीतही आंदोलन करतील असा निर्वाणीचा इशारा सबोर्डीनेट इंजिनिर्स असोसिएशनचे सरचिटणीस अभी. संजय ठाकूर यांनी दिला व त्यामुळे उदभवणार्या परिस्थितीस सर्वतोपरी तिन्ही कंपन्यांचे प्रशासन राहील असा ईशारा सरचिटणीस संजय ठाकूर यानी दिलेला आहे. मात्र आंदोलन करीत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही कोविड सेंटर/हॉस्पिटल्स/विलगीकरण कक्ष यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर दक्षता एस. ई. ए चे अभियंते घेणार आहेत.
काय आहेत मागण्या ?
महाराष्ट्रात कुठेही अनिवार्य रिक्त पदे न ठेवता विनंती बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अभियंत्यांना त्यांच्या विनंती ठिकाणी बदली करावी
अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी
कनिष्ठ अभियंता ते सहायक अभियंता पदोन्नती पॅनल त्वरित करावे
उपकार्यकरी अभियंता म्हणून पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना त्यांच्या पॅरेंट झोन मध्ये पदस्थपना द्यावी
महापारेषण मध्ये प्रमोशन पॅनल व स्टाफ सेट अप चा प्रलंबित प्रश्न सोडवावा
महानिर्मितीमधील मेडिक्लेम पोलिसीतीले त्रुटी दूर कराव्यात
प्रमोशन पॅनल वेळेवर करावे
महानिर्मित ची कमीत कमी 50%वीज विकत घेण्याचे अनिवार्य करावे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai