तोडकामप्रकरणी संजय राऊत, पालिकेचे वॉर्ड अधिकारी प्रतिवादी
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 22, 2020
- 649
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बेकायदेशीर बांधकाम असलेल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रानौत हिने केलेल्या मागणीनुसार उच्च न्यायालयाने महापालिकेचे वॉर्ड अधिकारी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी केले आहे. तसेच 25 सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या कार्यालयामधील तोडफोडीला स्थगिती देण्यात आली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह पालिका वॉर्ड अधिकारी यांना प्रतिवादी करण्याची मागणी कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आली होती. अनध़िकृत ऑफिस पाडल्याप्रकरणी कंगनाने केलेल्या विनंतीवरून खासदार संजय राऊत यांना उच्च न्यायालयाने प्रतिवादी केले आहे. बंगल्यावर तोडकामाची कारवाई करणारे पालिकेचे सहायक आयुक्त भाग्यवंत लाटे यांनाही प्रतिवादी केले आहे. उद्या सकाळी 11.30 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांनी माझ्याविषयी काही विधाने केली, त्यानंतरच पालिकेने दूष्ट हेतूने आणि आकसापोटी बंगल्यावर तोडकामाची कारवाई केली, असा आरोप केला.आपल्या कार्यालयावरील कारवाईनंतर ‘उखाड दिया’ या शब्दांत संजय राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्याची सीडी कंगनाच्यावतीनं मंगळवारी हायकोर्टात सादर करण्यात आली. त्यावर हायकोर्टानं संजय राऊत यांना उद्या बुधवारी सकाळी साडे अकरावाजेपर्यंत उत्तर देण्यासाठी नोटीस जारी केली आहे.
हायकोर्टाकडून प्रतिवादी करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेने अवैध बांधकामाबाबत केलेल्या कारवाईबाबत याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. मात्र तरीही यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावं अशी मागणी केली आहे. बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai