एनएमएमटीच्या 462 कर्मचार्‍यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट

नवी मुंबई ः कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेत ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविली जात आहे. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुर्भे आगारात 21 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत अँटिजेन टेस्टींग शिबीर राबविण्यात आले आहे. दोन दिवसात येथे 462 कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये 5 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आरोग्य विभागाप्रमाणेच महानगरपालिकेच्या इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मिशन बिगेन अगेन अंतर्गत काही प्रमाणात दैनंदिन जीवन व्यवहारांना सुरूवात करण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या एन.एम.एम.टी. बसेसही प्रवाशी सेवेचे काम करीत आहेत. या बसेसमध्ये कर्तव्य बजावणारे चालक, वाहन दररोज विविध नागरिकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे या कर्मचा-यांच्या आरोग्याची काळजी घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुर्भे आगारात 21 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीत अँटिजेन टेस्टींग शिबीर राबविण्यात आले आहे. दोन दिवसात येथे 462 कर्मचारयांची अँटिजेन चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये 5 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या कर्मचार्‍यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या लक्षणांनुसार योग्य वैद्यकीय सुविधेमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांच्या अतिनिकटच्या व्यक्तींची माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील 1 हजारहून अधिक वाहक, चालक व उतर कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेत सर्वांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.