Breaking News
14 मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचार्यांना कोरोना
मुंबई : राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नवीन रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोत्परी प्रयत्न सुरु आहेत. मात्र जेथून शासनाचा कारभार चालतो तेच मंत्रालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. आतापर्यंत 14 मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सर्वसामान्यांसह सिनेसृष्टी, राजकीय वर्तुळातही कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तर मंत्री कार्यालयातील अनेक कर्मचारी आणि इतर कर्मचारीही कोरोना पॉझीटीव्ह आढळू लागले आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, सुनील केदार, नितीन राऊत, हसन मुश्रीफ, अस्लम शेख, विश्वजित कदम, संजय बनसोडे, बच्चू कडू, अब्दुल सत्तार यांना कोरनाची लागण होऊन गेली आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि नितीन राऊत यांच्या कार्यालयातील प्रत्येकी 5 ते 6 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याने यांची मंत्रालयातील कार्यालये काही दिवस बंद ठेवण्यात आली होती.
काही अधिकारी कोरोनाची लागण झाल्याने घरी असून काही जण होमक्वारंटाईन आहेत. आधीच मंत्रालयात कर्मचारी, अधिकार्यांची उपस्थिती कमी असते, त्यात अनेक कर्मचारी, अधिकारी पॉझिटिव्ह येऊ लागल्याने त्याचा परिणाम मंत्रालयातील कामावर होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai