मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन

पनवेल ः मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी आज शुक्रवारी (दि. 25) रोजी पनवेलमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी, आमच्या हक्कांचे आरक्षण देण्याची मागणी केली.

मराठा आरक्षणासाठी पनवेलमध्ये सकाळीच आंदोलनकर्ते दाखल झाले. पनवेल तहसिल कार्यालयाच्या समोर हे ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.यावेळी कोर्टाने जाहीर केलेला निर्णय हा जुलमी असल्याचा आरोप आंदोलन कर्त्याने केला. तसेच कोर्टाने आदेश जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने राज्यात मोठी पोलिस भरतीची घोषणा केली होती, ही भरती आरक्षण दिल्याशिवाय करू नका अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. यात आरक्षण पहिले आणि नंतर नोकर भरती अशी मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात आज एकूण 25 ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. एकाच वेळी विविध ठिकाणच्या तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आज पुन्हा मराठा आंदोलन पेटणार असे चिन्ह दिसून येत आहे.