स्वच्छता कर्मचार्यांचा गौरव
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2020
- 917
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यात नेहमीच प्रथम व देशात सतत मानांकन उंचावणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकीक आहे. यामध्ये दररोज शहर स्वच्छ ठेवून नियमित योगदान देणार्या स्वच्छता कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने आयोजित स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामगिरी करून नवी मुंबई महानगरपालिकेस स्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवून देणार्या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील काळात आपण सर्व मिळून अधिक जोमाने काम करूया आणि आपले मानांकन उंचवूया असा निर्धार अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व्यक्त केला.
यावेळी अतिवृष्टीमुळे मागील वर्षी कोल्हापूर भागात उद्भवलेल्या आपत्ती प्रसंगात चांगली कामगिरी करणार्या स्वच्छताकर्मींचाही सन्मान करण्यात आला. यावेळी 5 अधिकारी आणि 180 सफाई कर्मचारी यांचा भेटवस्तू व प्रशस्तिपत्रे देऊन सन्मान करण्यात आला. कोल्हापूरला गेलेल्या मदतकार्य पथकात उल्लेखनीय कामगिरी करणारे दिवंगत उप स्वच्छता निरीक्षक सत्यजित देवधर यांच्या पत्नीने त्यांच्या वतीने सन्मान स्विकारताना उपस्थितांनी उठून उभे रहात देवधरांच्या समर्पित कार्याला आदरांजली अर्पण केली. अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत होत असलेला आमचा मानसन्मान मनाला आनंद देणारा असून यापुढील काळात अधिक चांगले काम करून नवी मुंबईला देशात आघाडीवर नेऊ असा निश्चय केला असल्याचे मत अनेक सफाई कर्मचा-यांनी व्यक्त केले. कोल्हापूरला गेलेल्या 80 जणांच्या मदतकार्य पथकाचे प्रमुख कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी तेथील आव्हाने, संकटे व त्यावर जिद्दीने केलेली मात याबद्दलचे अनुभव कथन केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai