काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : सर्वसामान्यासह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण होत आहे. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण उपस्थितीत होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. याआधी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.