कोविड सेन्टरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण

विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली पाहणी ; दोषींवर कारवाई करण्याची मागणी

पनवेल : कळंबोली येथील टियारा हॉल कॉरंटाईन सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या ठिकाणची पाहणी केली. निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवणार्‍या वर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. 

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी कोविडवर मात करून ते जनतेच्या हितासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. पनवेल महानगरपालिकेचे 115 बेड उपलब्ध असणार्‍या कळंबोली येथील टियारा हॉल कॉरंटाईन सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार येताच म्हात्रे यांनी सदर कॉरंटाईन सेंटरमध्ये धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेतला. कळंबोली येथील कोरंटाईन सेंटरमध्ये पाहणी केली असता यावेळी जेवणात कधी झुरळ तर कधी केस सापडत असल्याचे रुग्णांकडून समजले. यावर प्रितम म्हात्रे यांनी येथील संबंधित कर्मचार्‍यांना धारेवर धरत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सदर विषयात हस्तक्षेप करून दोषींवर कार्यवाही करण्यास सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या सोबत शेकाप चिटणीस गणेश कडू, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत, सारिका भगत व उज्वला पाटील या वेळी उपस्थित होते.