महात्मा गांधी यांना अभिवादन

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, गांधी जयंतीनिमित्त प्रिय बापूंना नमन करतो. त्यांच्या आयुष्यापासून आणि उदात्त विचारांमधून बरेच काही शिकायचे आहे. समृद्ध भारत घडविण्यात बापूंचे आदर्श आम्हाला मार्गदर्शन करत राहतात, असं मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीटसोबत स्वच्छतेचा संदेश देणार एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं.