आम आदमी पार्टीचे जनआक्रोश आंदोलन

हाथरस बलात्कार घटनेचा निषेध 

नवी मुंबई ः उत्तर प्रदेशातील हाथरस,बलरामपूर आणि अजमेर  बलात्कार घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, नवी मुंबई कडून सोमवार 5 ऑक्टोबर, रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

हाथरस, बलरामपूर, अजमेर बलात्कार घटनेबद्दल पूर्ण भारतात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आम आदमी पक्ष, नवी मुंबई तर्फे जनआक्रोश आंदोलन आयोजित करून ह्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. देशातील बलात्काराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक कायदे करणे आणि  त्यांची प्रभावी अमलबजावणी करणे, निष्पक्ष चौकशी त्वरित चालू करणे आणि  अपराध्यांना फाशी सारख्या कडक शिक्षा करणे ह्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. 

हाथरस येथील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना तर निषेधार्य आहेच. पण त्याचबरोबर, उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचे हे प्रकरण दाबून टाकण्याची संशयास्पद धडपड नक्कीच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. जर मध्य रात्री राज्यपालांना उठवूंन मुख्यमंत्र्यांचा शपथ विधी पार पडू शकतो तर बलात्कार रोखण्यासाठी कडक कायदे का होत नाही असे परखड मत अध्यक्ष प्रमोद महाजन आणि मीडिया प्रमुख, आम आदमी पक्ष नवी मुंबई ह्यांनी व्यक्त केले. आंदोलनात नवी मुंबई, ठाणे येथील वरिष्ठ पदाधिकारी, नवी मुंबईच्या उपसंयोजक मलिका सुधाकर, महिला उपाध्यक्ष सुलोचना शिवानंद, न्यायिक कमिटीच्या सेक्रेटरी सुवर्णा जोशी यांनी आपला रोष दर्शविला.