Breaking News
नवी मुंबई : कोरोनावरील उपाययोजनांसाठी नवी मुंबई महापालिकेने सात महिन्यांत 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. वाढती बाधितांची संख्या पाहता खर्च अजून वाढणार असून पालिकेने शासनाकडे 294 कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवला आहे.
करोनाच्या लढयात पालिकेने मोठया प्रमाणात खर्च केला असून प्रस्तावित खर्चाच्या अनुदानापोटीचा एकूण 294 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती पालिकेच्या वित्त विभागाने दिली आहे. शहरात मार्चपासून सुरू झालेल्या करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत एकूण 38 हजारांपर्यंत करोनाबाधित झाले आहेत. त्यासाठी मोठा खर्च करावा लागला असून नवी मुंबई महापालिकेने अल्पावधीत एमएमआर क्षेत्रातील सर्वात मोठी व अद्ययावत करोना चाचणी प्रयोगशाळा त्याचप्रमाणे 20 दिवसांत सिडको प्रदर्शनी केंद्र येथे 1200 खाटांचे रुग्णालय उभारले. तसेच शहरात विविध ठिकाणी प्राणवायू खाटा, अतिदक्षता खाटा तसेच विविध प्रकारच्या आरोग्यसुविधा पुरवल्या आहेत. तर करोनाकाळात रुग्णांसाठी जेवण, शहरात निर्माण करण्यात आलेल्या 10 ठिकाणच्या कोरोना केअर सेंटर उभारली आहेत. त्याचबरोबर नव्याने करोना कालावधीसाठी कर्मचार्यांची भरती प्रक्रिया राबवली आहे. सातत्याने वाढणार्या या खर्चामुळे पालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai