खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सफाई कामगारांचा सिडको भवनात ठिय्या

  पनवेल : कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारातही सिडकोअंतर्गत काम करणारे सफाई कामगार प्रामाणिकपणे आपले काम करत आहेत. मात्र त्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. 

सिडकोकडून सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याची तातडीने दखल घ्यावी, यासाठी सर्व सफाई कामगारांनी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको भावनावर मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. सिडकोच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये 650 सफाई कामगार कार्यरत आहेत. यामध्ये नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन 324, सिडकोची सर्व कार्यालये 200, उलवे, द्रोणागिरी, करंजाडे नोड 135, तसेच औषध फवारणीसाठी 25 असे एकूण 650 सफाई कामगार कार्यरत आहेत. यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. सोमवारी कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी सिडको भवन च्या गेट समोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. सामाजिक अंतर राखून कामगारांनी सिडकोच्या धोरणाचा निषेध नोंदवला. फलकाद्वारे आपल्या मागण्या सिडको समोर मांडल्या. कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणार्‍या सिडकोच्या सफाई कामगारांना कोविडचा पन्नास लाख रुपये विमा जाहीर करावा, कोविड भत्ता द्यावा, कोरोना संसर्गजन्य रोगाची योग्य ती सुरक्षा साहित्य पुरवावी, खांदेश्‍वर रेल्वे स्टेशनचा सफाई कामगार निवृत्ती म्हात्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला सिडकोने तातडीने 50 लाख रुपये द्यावे, चालू वर्षाच्या दोन जोडी गणवेश देण्यात यावे, या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

कामगारांच्या न्याय हक्कासाठी सिडको विरोधात हे आंदोलन पुकारले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मध्यस्थी करून सिडको अधिकारी आणि आझाद कामगार संघटनेची बैठक घडवून आणली. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहोत. सिडको महामंडळाच्या पॉलिसीमध्ये बसणार्‍या मागण्या आम्ही निश्‍चितच पूर्ण करू, असे यावेळी रेल्वे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे यांनी सांगितले. 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट