एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई ः मराठा आरक्षणाचा प्रश्‍न  प्रलंबित असताना होऊ घातलेल्या एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानतंर पत्रकारांशी बोलताना हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. हा निर्णय कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्याने सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एमपीएसी परीक्षा रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी मुंख्यमंत्र्यांचे आभिनंदन केले. आता ही परीक्षा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी नेत्यांबरोबर बैठक सुरु झाली आहे. त्यांनी एमपीएसी परीक्षा पुढे ढकलू नये अशी मागणी केली आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांचे वाढते वय हा मुद्दा लक्षात घेता 

परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा मराठा नेत्यांनी पुर्नविचार करावा अशा मागणी केली होती.