मनसेच्या खारघर गडचे उद्घाटन

पनवेल : राजकीय समीकरणे बदलत असताना मनसेने पुन्हा एकदा नव्या उमेदीने मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. राज्यभर असंख्य तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मनसेत प्रवेश करीत आहेत. पनवेल तालुक्यातील खारघर येथेही खारघर गड नावाने मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच आमदार राजुदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

नागरिकांचा राज ठाकरे यांच्यावरील विश्‍वासामुळे कृष्णकुंजवर न्याय मिळतोय. आता ज्या पद्धतीने मनसैनिक यांची महाराष्ट्रभर मनसेमध्ये रीघ लागली आहे, ते पाहता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता स्थानिक कार्यकर्तेच जोमाने कामाला लागतील असे यावेळी मनसे नेते नितीन सरदेेसाई यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार राजू पाटील, मनसे नेते नितीन सरदेसाई, सरचिटणीस रीटा ताई गुप्ता, मनसेचे आमदार राजुदादा पाटील, मनसे रस्ते आस्थापना राज्य चिटणीस योगेश चिले, मनसे नेते संतोष धुरी, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष ऍड.अक्षय काशीद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.