करदात्यांना मिळणार रकमेचा परतावा

नवी दिल्ली : देशातील इनकम टॅक्स विभागाकडून दिवाळीच्या आधीच करदात्यांसाठी दिवाळीची भेट देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डनं आपल्या 38.11 लाख करदात्यांना 1,23,474 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा परतावा देण्याचे स्पष्ट केले आहे. 

इनकम टॅक्स विभागाच्या माहितीनुसार हा परतावा 1 एप्रिल 2020 ते 13 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या कालावधीतील असेल. यामध्ये 36.21 लाख जणांना देण्यात आलेला 33442 कोटी रुपयांचा  पर्सनल इनकम टॅक्स आणि 90,032 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स समाविष्ट आहे. इनकम टॅक्स विभागाच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केल्यानंतर परताव्याच्या प्रक्रियेला गतीमान करण्यात आलं आहे. परिणामी यंदाच्या वर्षी कोणालाही आयकर विभागाकडे परताव्यासाठीची विनंती करावी लागणार नाही. CBDT नं सांगितल्यानुसार परतावा न मिळालेल्यांनी ताबडतोब ई- मेलवर उत्तर द्यावं. जेणेकरुन त्यांना लवकरात लवकर परतावा मिळू शकणार आहे. परताव्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातच असणार आहे. परताव्याबाबतच जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. करदाते त्यांच्या कराच्या परताव्याबाबत जाणू इच्छत असल्यास त्यांनी सर्वप्रथम इनकम टॅक्स विभागाच्या  www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

- इथं युजर आयडी आणि पासवर्ड देऊन लॉगइन करावं. 

- त्यानंतर View Returns/Forms' वर क्लिक करावं. 

- पुढं Income Tax Returns'  वर क्लिक करावं. 

- नंतर ऍक्नॉलेजमेंट नंबरवर क्लिक करावं. जे एका हायपरलिंक स्वरुपात असेल. तिथं FY 2019-20, असेसमेंट इयर Y 2020-21 निवडा.