एपीएमसीत स्पेनचा हापूस दाखल

नवी मुंबई :  एपीएमसी फळ बाजारात स्पेनचा हापूस दाखल झाला आहे.  या हापुसच्या 10 आंब्यासाठी 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. याचप्रकारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वॅाशिंग्टन, साऊथ आफ्रिका, तुर्की, इराण, बेल्जीयम, चायना, कॅलिफोर्निया या सर्व देशातून फळांची आयात केली जात आहे. 

कोेकणचा हापुस चाखण्यासाठी नववर्षाची म्हणजेच गुढीपाढव्याची वाट पाहावी लागते. या मुहुर्तावर एपीएमसीत आंब्याची पहिली पेटी दाखल होते. मात्र आता परदेशातून फळे आयात होत असल्याने कोणत्याही हंगामात कोणतेची फळ चाखता येते. नवी मुंबईतील एपीएमसीमधील फळ बाजारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वॅाशिंग्टन, साऊथ आफ्रिका, तुर्की, इराण, बेल्जीयम, चायना, कॅलिफोर्निया या सर्व देशातून फळांची आयात केली जाते. ज्यामध्ये स्पेनचा हापूस, किवी, पेर, ब्लु बेरी, द्राक्ष यांसारख्या बर्‍याच फळांचा समावेश असतो. सध्या स्पेनचा हापूस एपीएमसीत दाखल झाला आहे. या आंब्याची चव चाखण्यासाठी 10 आंब्यांमागे 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या बाजारात भारतीय सफरचंद मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. विदेशी फळांच्या तुलनेत भारतीय फळे ही स्वस्त आणि चवीला उत्तम दर्जाचे असतात. सध्या फळ मार्केटमध्ये इंपोर्टेड सफरचंदाच्या तुलनेत भारतीय सफरचंदाची विक्री ही मोठ्या प्रमाणावत होत आहे.