सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत लवकरच निर्णय

राज्य सरकारने दिले संकेत

मुंबई : सामान्यांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे याविषयी अधिकृतपणे घोषणा कधी होणार व लोकल प्रवासाची मुभा मिळणार याची प्रतिक्षा प्रवासी करत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणार्‍या लोकलमधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. ट्विटरवर एका युजरने प्रश्‍न विचारला होता की, अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचारी, वकील आणि महिलांसाठी लोकल सुरु आहेत. मग सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार ?

 त्यावर उत्तर देताना मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टिवार म्हणाले की, लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबत अनेक लोकांशी चर्चा केली आहे. त्यांच्या या उत्तराने लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.