आता शाळेत शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के

मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको म्हणून सरकार टप्प्याटप्प्याने शिक्षणासंबंधीचे निर्णय घेत आहे. आता राज्य सरकारने शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीविषयी नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन, ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. शासकीय, खासगी, अनुदानित विना अनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे. 50 टक्के क्षमतेने उपस्थित राहता येणार आहे.

याआधी 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली जाहीर केली होती. यात शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येण्यास परवानगी देण्यात आली होती. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे. 

राज्य सरकारचा नवा आदेश

राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था 31.10.2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाइन/ ऑफलाइन शिक्षण आणि दुरस्त शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दुरस्त शिक्षण / Tele-Counselling आणि त्याच्याशी संबंशित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित, विना अनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालविण्यात येणार्‍या शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन / दुरस्थ शिक्षणाशी संबंधित कामांसाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिषिष्टामध्ये देण्यात आल्या आहेत. तसंच या विभागाच्या संदर्भाधीन 15 जुन, 2020 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांचे पालन करण्यात यावे.