4 नोव्हेंबरचे पाण्याचे शटडाऊन रद्द

नवी मुंबई ः भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे दि. 04 नोव्हेंबर 2020 रोजी पाणी पुरवठा विभागामार्फत घेण्यात येणारा शटडाऊन रद्द करण्यात आला आहे. सदर रद्द करण्यात आलेला शटडाऊन पुढे घेण्यात येणार आहे. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत दि. 04 नोव्हेंबर 2020 रोजी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील सब स्टेशनचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार होता. या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्याचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहणार होता. मात्र भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांचे मार्फत दि. 04 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्यात येणारा शटडाऊन महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळाची जलवाहिनी खिडकाळी येथे फुटल्यामुळे रद्द करण्यात येत आहे. सदर रद्द करण्यात आलेला शटडाऊन पुढे घेण्यात येणार आहे. याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.