मे 2021 पर्यंत नवी मुंबई विमानतळ सुरु करा

नवी मुंबई : महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळासाठी 2019 ची डेडलाईन दिली होती. मात्र अनेक अडथळ्यांमुळे  हे काम पुर्णत्वास उशीर होत आहे. आता मे 2021 नवी मुंबई विमानतळ सुरु करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या अधिकार्‍यांची ठाकरे यांनी बैठक घेतली त्यात हे निर्देश दिले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या विमानतळाचे टेकऑफ डिसेंबर 2019 मध्ये होईल असा दावा केला होता.  मात्र, नंतर मे 2020 ची तर नंतर डिसेंबर 2020 ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. अद्यापही हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.  त्यामुळे येत्या डिसेंबरपासून हे विमानतळ सुरू होऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही परिस्थितीत मे 2021 पर्यंत विमानतळ सुरू व्हायला हवे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. हे विमानतळ सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मे 2021 पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अदानी समूहांकडे हस्तांतरीत होणार विमानतळाचे काम  मे 2020 ची तर नंतर डिसेंबर 2020 ची डेडलाईन ठरविण्यात आली होती. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मे 2021 पर्यंत काम पूर्ण व्हायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे विमानतळ जीव्हीके ग्रुपकडून अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.