पोलीस गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत संपन्न

नवी मुंबई ः सिडको महामंडळाच्या पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 4,466 घरांची संगणकीय सोडत मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 रोजी सिडको भवन येथे यशस्वीरीत्या पार पडली. एकूण 4,466 सदनिकांपैकी 1,057 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि 3,409 या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.

सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै 2020 रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत 4,466 घरे (सदनिका) मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी राज्याला आखून दिलेल्या सर्वांसाठी घरे या धोरणांतर्गत सदर योजनेतील सदनिका या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटात यांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजने अंर्गत परवडणार्‍या घरांची योजना व सी.एल.एस.एस. योजनांतर्गत समाविष्ट आहेत. एकूण 4,466 सदनिकांपैकी 1,057 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि 3,409 या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. 27 जुलै 2020 पासून योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली व त्यास 29 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 

अर्जदारांच्या सोयीसाठी सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपणही करण्यात आले. सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडको महामंडळाच्या हीींिीं://लळवले.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर प्रत्येक योजनानिहाय पीडीएफ स्वरुपात लावण्यात आली आहे व एकत्रितरित्या संपूर्ण सोडतीची यादी योजनेचे संकेतस्थळ हीींिीं://श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा यावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व यशस्वी अर्जदारांकरीता कागदपत्रांची पूर्तता इ. पुढील प्रक्रियांबाबत निवारा केंद्राच्या हीींिीं://लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.  

सदर योजनेची संपूर्ण प्रक्रिया पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली व सिडकोतर्फे नेमण्यात आलेल्या प्रोबेटी सॉफ्ट प्रा. लि. या कंपनीमार्फत करण्यात आली होती. पर्यवेक्षण समितीमध्ये सुरेशकुमार, माजी सनदी अधिकारी व उप लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य आणि मोईज हुसैन, उप महासंचालक, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांचा समोवश होता. संगणकीय सोडत ऑनलाईन पध्दतीने असल्याने संपूर्ण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक, सुलभ, अत्यंत सोपी, सुसष्ट व सहज समजेल अशी होती. तसेच उपस्थित अर्जदारांच्या समक्ष सोडत काढण्यात आली.