रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करा

लोकप्रतिनिधींची पालिकेकडे मागणी

पनवेल : पनवेल शहरातील बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मात्र अजूनही मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होणे बाकी आहे. या रस्त्याची तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी पनवेल पालिकेचे आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत आहे.पनवेल हे तालुक्याचे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मोठी बाजारपेठ याच शहरात आहे, पनवेल शहरात रोज लाखोंच्या संख्येने नागरिक खरेदी विक्रीच्या दृष्टीने ये जा करत असतात. त्यामुळे दररोज वाहनांची मोठी वर्दळ शहरात पहावयास मिळते. त्यामुळे परिसरातील रस्त्यांचे सिमेंट कोंक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील आगरी समाज हॉल रस्ता, कै.शांताबाई गणपत घाडगे मार्ग (नवीन कोर्टाच्या मागील बाजूस), रूपाली सिनेमा येथील रस्ता (महाराष्ट्र बँक ते रूपाली सिनेमा थेटर), जुने कोर्ट ते पाडा मोहल्ला बडी मस्जिद, पाडा मोहल्ला बडी मज्जिद ते शनी मंदिर, शनी मंदिर ते हॉटेल पंचरत्न, नाडकर्णी हॉस्पिटल ते प्रिन्स पॅराडाईस सोसायटी येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण बाकी आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.