स्तन कर्करोगाच्या विरोधातील लढाईत ‘ल्युम्पेक्टॉमीचे’ योगदान

महिलांना होणार्‍या कर्करोगांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी हा आजार होणार्‍या महिलांची संख्या 2.1 मिलियन असून कर्करोगामुळे होणार्‍या सर्वाधिक मृत्यूंचे कारण देखील स्तनांचा कर्करोग हेच आहे. आयुर्मानामध्ये वाढ, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे आहेत. अधिक विकसित भागांमधील महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त असले तरी दरवर्षी जगाच्या प्रत्येक भागात केसेस वाढत आहेत ही देखील वस्तुस्थिती आहे. या आजारांमध्ये उपचारांचे चांगले परिणाम मिळावेत आणि रुग्णांना अधिक चांगले जीवन जगता यावे यासाठी आजाराचे स्वरूप लवकरात लवकर निश्‍चित होणे आवश्यक असते. यासाठी लवकरात लवकर निदान केले जाणे आणि स्क्रीनिंग या दोन स्ट्रॅटेजीज गरजेच्या असतात. लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी कॅन्सरवरील उपचार वेळेवर सुरु करण्यावर आणि प्रभावी निदान सेवांची उपलब्धता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. स्क्रीनिंगमध्ये कोणत्याही कोणत्याही लक्षणांची सुरुवात होण्याच्या आधी परीक्षण केले जाते. स्तनांच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगच्या काही प्रकारांमध्ये मॅमोग्राफी, क्लिनिकल स्तन परीक्षण आणि स्वतःच स्तनांची तपासणी करणे यांचा समावेश आहे.

रॅडिकल मॅस्टेक्टॉमी (एमआरएम) ही स्तनांच्या कॅन्सरसाठी सर्जरी आहे.

स्तनांचा कर्करोग झाला आहे याची जर तपासणीमध्ये खात्री झाली तर त्यावरील उपचारांसाठी ऑन्कोलॉजिस्ट्स एक उपचार योजना तयार करतात. रॅडिकल मॅस्टेक्टॉमी (एमआरएम) ही स्तनांच्या कॅन्सरसाठी अतिशय सर्वसामान्य सर्जरी आहे, यामध्ये रिकन्स्ट्रक्शनसह किंवा त्याशिवाय स्तन पूर्णपणे काढून टाकले जातात. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी (बीसीएस) हा अजून एक पर्याय आहे याला ल्युम्पेक्टॉमी असे म्हणतात.  ल्युम्पेक्टॉमीमध्ये फक्त ट्युमर काढला जातो आणि स्तनाचा बाकीचा निरोगी भाग तसाच ठेवला जातो. जर्नल ऑफ ग्लोबल ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार ज्या रुग्णांवर मॅस्टेक्टॉमी (एमएस) केली जाते ते ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी (बीसीएस) करण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी काळ जिवंत राहू शकतात.

बीसीएसचा सल्ला कोणाला दिला जातो आणि कोणाला नाही?

बीसीएस स्तनामध्ये उत्पन्न झालेला ट्युमर आणि त्याच्या आजूबाजूच्या सामान्य स्तन पेशी किंवा लिम्फ नोड्स काढून टाकल्या जातात.  ट्युमरचा आकार केवढा आहे आणि त्याचे नेमके स्थान यानुसार त्याचा किती हिस्सा काढून टाकायचा आहे ते निश्‍चित केले जाते. ज्या रुग्णांमध्ये स्तन कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे त्यांच्यासाठी बीसीएस चांगला पर्याय आहे. या सर्जरीमध्ये स्तनांचा अधिकांश भाग तसाच कायम ठेवला जातो पण बीसीएसनंतर काही रुग्णांना रेडिएशनची आवश्यकता भासू शकते. काही महिलांवर हार्मोन थेरपी किंवा केमोथेरपी यासारख्या अन्य उपचारांची देखील गरज लागू शकते. ज्या महिलांवर सुरुवातीच्या टप्प्यावरील कॅन्सरसाठी मॅस्टेक्टॉमी केली गेली आहे त्यांना रेडिएशनची आवश्यकता कमी असते पण त्यांची स्थिती आणि केसच्या अनुषंगाने तपासणीसाठी त्यांना रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टकडे पाठवले जाऊ शकते. ज्या रुग्णांची स्थिती रेडिओथेरपी ट्रीटमेंटसाठी अनुकूल नाही आणि जे स्वतः रेडिएशनच्या विरोधात आहेत अशा रुग्णांना बीसीएसचा सल्ला दिला जात नाही.

ल्युम्पेक्टॉमीमध्ये ट्युमर काढून स्तनाचा आकार कायम ठेवला जातो.

ल्युम्पेक्टॉमीमध्ये ट्युमर काढून टाकण्याबरोबरीनेच स्तनाचे सामान्य रूप देखील कायम ठेवले जाते. सर्वसामान्यतः यामध्ये जनरल अनेस्थेशिया दिला जातो. ट्युमरचे नेमके स्थान, योग्य प्रकारे समजून येणे हे या प्रक्रियेच्या यशासाठी आणि कमीत कमी स्तन पेशी काढून टाकल्या जाव्यात यासाठी महत्त्वाचे असते.  सर्जरीच्या नंतर रक्तस्त्राव, संसर्ग, वेदना, सूज, स्तन नरम पडणे, सर्जरीच्या खुणा, स्तनाचा आकार आणि रूपामध्ये बदल होणे, छाती व बगलेमध्ये वेदना असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.

सर्वसामान्यतः ल्युम्पेक्टॉमी ही आऊट पेशंट सर्जरी सेंटरमध्ये केली जाते आणि यासाठी हॉस्पिटलमध्ये रात्रभर राहण्याची गरज भासत नाही. बहुतांश केसेसमध्ये रुग्ण घरी गेल्यानंतर स्वतःची बरीचशी कामे स्वतः करू शकतात आणि दोन आठवड्यांनंतर आपली इतर सर्व नियमित कामे सुरु करू शकतात. परंतु सर्जरी किती मोठी झाली आहे त्यानुसार काही महिलांना घरी मदतीची आवश्यकता लागू शकते. रुग्णांना आपल्या डॉक्टरांकडून उपचारांनंतर व्यवस्थापन आणि देखभालीबद्दल रुग्णांच्या जीवनशैलीला अनुकूल मार्गदर्शन करण्याबाबत सांगितले गेले पाहिजे. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे स्तन कर्करोगाचे उपचार केले गेले असोत वा नसोत, कर्करोगाचे निदान केले गेले असो वा नसो, नियमितपणे तपासणी करवून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक टप्प्यावरच आजार लक्षात आला तर वेळीच उपचार करता येतात आणि रुग्णाची चांगली काळजी घेतली जाऊ शकते. असे झाल्यास, कॅन्सरविरोधातील लढ्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकू.

(डॉ. संदीप बिपटे, कन्सल्टन्ट, ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबई)