निळा सावळा श्री कृष्ण

मीरा के बोल 

व्याकुळ मन माझे
शोधी निखळ प्रेमझरा
त्या वेड्या नभी बरसे
रिमझिमत्या पाऊस धारा ....

चिंब ढगातुन मंद हवेतुन
येई वारा प्रीतीचा;
ओलसर होऊन  जाई,
पदर त्या रात्रीचा ...

धुंद होऊनी आनंदात
चाले खेळ हा लाटांचा
त्यासवे मदमस्त होऊन
नाचे नीळा कृष्ण राधेचा ..

त्यास पाहुनी हरपुनी जाई
कृष्ण देखणी राधा
अन त्या सावळ्यास चोरूनी
पाहि कृष्ण वेडी मीरा ....

गोपगोपीकांची लाडी रंगता
चिढून जाई राधा
मीरा मात्र नेई गाभारी
देखण्या त्या मुकुंदाला ...

प्रेमा पलीकडच्या तिच्या प्रेमाला
नसे कसलाच अहंकार
दुखाच्या अंधारात असे
प्रेम तिचे जाणु दिपमाळ...

काळ्या भोर राधेच्या नयनात
केवळ असे कृष्ण तिचा
पण मुकुटावर श्रीरंगाच्या
डौलत असे प्रेम रत्न मीराचा ...

अंत नसे या प्रेमाला
ही युगायुगाची गोष्ट
कलियुगात ही आहे
राधा मीरा आणि एक
निळा सावळा श्री कृष्णा ....
-मीरा पितळे