कान्हा मला पुढच्या जन्मी

मीरा के बोल
कान्हा मला पुढच्या जन्मी
होऊ देत बासुरी तुझी
ओठांचा स्पर्श होताच
सुरेल मैफिल सजवेन तूझी ...

कान्हा माला पुढच्या जन्मी
होऊ देत  सुंदर मोरपीस
कौतुकाने बसेन तुझ्या मुकुटावर
बघ शोभेन मी तुझ्या शिरावर ...

कान्हा माला पुढच्या जन्मी
होऊ देत शुभ्र मोती
राहीन तुझ्या कंठीत सत्त
वाढेल तुझा लौकीक ....

कान्हा माला पुढच्या जन्मी
होऊ देत  राधा तुझी
मीरा होऊन तेच दुखं
पुन्हा सोसायचे नाही ...

-मीरा पितळे