सिडकोतील अधिकारी-कर्मचार्‍यांची कोव्हीड तपासणी

नवी मुंबई : कोरोना विषाणूचा नवी मुंबईसह राज्यात आणि देशात पुन्हा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या ताळत सेवा बजावणार्‍या सिडको कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे देखील कोव्हीड पासून रक्षण व्हावे यासाठी सिडकोतील अधिकारी कर्मचार्‍यांच्या कोव्हीड आरटी-पीसीआर तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. सिडको एम्फ्लॉईज युनियनने  केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने ही तपासणी करण्यात येत असून 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान ही तपासणी करण्यात येणार आहे.  

सिडको एम्फ्लॉईज युनियनच्या वतीने सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांची मोफत कोव्हीड-19 तपासणी करण्याची विनंती सिडको व्यवस्थापनाला केली होती. त्यामुळे सिडको आरोग्य विभागाने नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत सिडको भवन येथे 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत सिडको कर्मचारी-अधिकार्‍यांठी मोफत कोव्हीड तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने पहिल्याच दिवशी सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.बावस्कर, मुख्य लेखाधिकारी बिवलकर, मुख्य अग्निशमन अधिकारी माणके, फ्लॅनर रवी, के. प्रिया, सुरक्षा अधिकारी या विभाग प्रमुखांसह इतर अधिकारी तसेच युनियनचे सरचिटणीस जे. टी. पाटील, उपाध्यक्ष नरेंद्र हिरे, पदाधिकारी मिलिंद बागुल, नितीन कांबळे, संजय पाटील, राऊत यांच्यासह इतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, आदिंनी कोव्हीड तपासणी करुन घेतली. यावेळी युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल यांच्यासह सिडकोचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पुढील तीन दिवसात दररोज सकाळी 9.30 ते 3 या वेळेत उर्वरीत सिडको अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपली कोव्हीड तपासणी करुन घेण्याचे आवाहन युनियनचे सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी केले आहे.