विनामूल्य ऑनलाईन योगसत्राला उत्स्फुर्त सहभाग

नवी मुंबई : कोव्हीड-19 या विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या विषाणूने प्रत्येकाला पूर्णपणे भिन्न जीवनशैलीत जगण्यास भाग पाडले आहे. अशा परिस्थितीत योगाचे महत्त्व लक्षात घेऊन वाशीतील प्रसिध्द ऍक्युपंक्चरीस्ट डॉ.जगदीश नाईक आणि सहयोगी योग शिक्षकांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विनामूल्य ऑनलाईन व्यावहारिक  योग सत्र सुरु केले  आहेत. या योगसत्रात देशभरातील नागरिक सहभागी होत आहेत.  

कमी रोग प्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये कोव्हीड संक्रमणाच्या  तीव्रतेत धोका वाढवत असल्याचे तसेच ज्या व्यक्तींमध्ये तणाव, चिंता, शारीरिक हालचालींची कमतरता आहे. तसेच योग्य आहाराची कमतरता असल्यामुळे त्यांच्यातील रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊन त्यांना कोरनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत योगाचे महत्व लक्षात घेऊन वाशीतील ऍक्युपंक्चरीस्ट डॉ.जगदीश नाईक आणि त्यांच्या सहयोगी योग शिक्षकांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विनामुल्य ऑनलाईन व्यावहारिक योग सत्र सुरु केले आहेत. लोकांच्या सोयीसाठी हे योग सत्र सकाळी आणि संध्याकाळी घेण्यात येत आहेत. योगासनात मुख्यत रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे, तणाव क्यवस्थापित करणे, आसने, प्राणायाम आणि वेगवेगळया विश्रांती तंत्राचा समावेश करण्यात आल्याची माहिती एस.आय.डब्ल्यू.ए.च्या विजया चंद्रन यांनी दिली.   

योग सत्रानंतर त्याच क्यासपीठावर विविध क्षेत्रांतील नामवंत क्यक्तींचे क्याख्यान घेऊन, साधकांना चांगले आरोग्य आणि शांतता मिळावे यासाठी योगाचे महत्त्व आणि त्याबद्दलच्या अधिक गोष्टी समजावून सांगितल्या जात आहेत. त्यामुळे नियमित योगासने करणाऱया अनेक व्यक्तींना त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत सुधारणा झाल्याचे, तसेच त्यांचे उच्च रक्तदाब, स्नायूंच्या वेदनांपासून आराम, पचन सुधारणे, बध्दकोष्ठता पासून मुक्ती आदि प्रकारे त्यांना फायदा झाल्याचे आढळून आले आहे. डॉ.जगदीश नाईक यांनी नि:स्वार्थीपणे सुरु केलेल्या या कार्याची दखल घेऊन कोपरखैरणेतील साऊथ इंडियन वेल्फेअर असोसिएशनने (एस.आय.डब्ल्यू.ए.) नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.