मीरेचे अंगण

मीरा के बोल

अनेकदा पाहिले तुला अंगणात राधेच्या
तिथपासून ठरविले आणायचे तुला
एकदातरी अंगणात मीरेच्या...
छोटं छान उबदार अंगण मीरेचं

तिथेही असतो झुला झाडावर डोलत
पण एकटाच, श्रीरंग नसतो त्यावर स्वार
ह्या अंगणात ही आहे चाफा पण निरर्थक
माधवाला कुठे वेळ, तो नाही इकडे फिरकत ...

अंगणी आहे एक छोटिशी तुळस
उदास बिचारी जन्माची
नाही पाहिला हरि तीने
वाट पाहते ती केव्हाची ...

राधा एकदा तरी येऊ दे सखा अंगणी
तुला सोबत लाभली त्याची सदाची
एकदिवस फक्त असुदेत कृष्ण मीरेचा
उपकार एक राहील मग तुझा सदाचा ...

बहरुदे चाफा एकदाच पाहुनी हरीला
आनंदाने झुलूदे झोक्यावर मग त्याला
होऊदेत सार्थक त्या तुळशीच्या जन्माचेे
अंगणी येऊन, माधवाला गुंणगुंणुदे
एकदातरी गाणे मीरेचे ...

- मीरा पितळे