आयुक्तांच्या आदेशानंतर कार्यवाहीला सुरूवात

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केली तुर्भे विभागातील स्वच्छता कामाची पाहणी

नवी मुंबई ः महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ च्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये केलेल्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात करण्यात आलेली आहे. त्या कामांचा अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांचेसह तुर्भे विभागातील स्वच्छतेची पाहणी करीत आढावा घेतला. याप्रसंगी विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त सुबोध ठाणेकर, कार्यकारी अभियंता मनोज पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी  राजेंद्र सोनावणे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  

यामध्ये परिसर स्वच्छतेप्रमाणेच प्रामुख्याने मोराज सर्कल सानपाडा, स्व. सिताराम मास्तर उद्यान, पिंपळपाडा, सानपाडागांव, आनंदनगर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर परिसरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाच्या स्वच्छतेची पाहणी करीत त्याठिकाणी अधिक स्वच्छतेविषयी सूचना देण्यात आल्या. स्वच्छतेविषयी केलेल्या सूचनांची पूर्तता एक आठवड्याच्या कालावधीत करण्याविषयी संबंधितांना सूचित करण्यात आले.