एकात्मिक नियमावलीच्या अमंलबजावणीसाठी कार्यशाळा

ठाणे ः महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने संपुर्ण राज्यातील बांधकामांसाठी एकसमान अशी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मागील आठवड्यात मंजुरी दिली आहे. ह्या नियमावलीची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्याभरात विविध प्राधिकरणातील अधिकार्‍यांना सर्वंकष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व गृहनिर्माण विभागाचे मंत्री डॉ  जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सभागृहामध्ये पार पडले. 

राज्यातील सर्व शहरी तसेच ग्रामीण भागासाठी (मुंबई, एम आई डी सी, हिल स्टेशन इ.क्षेत्रे वगळता) एकसमान अशी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मागील आठवड्यात मंजुरी दिली आहे. सदर नियमावली द्वारे आता राज्यात सर्व ठिकाणी एकसमान नियम लागू झाले आहेत. ह्या नियमावलीद्वारे शासनाने विहित केलेली धोरणे, नियम यांचा सामान्य नागरिकांना लाभ तेव्हढ्याच प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्याभरातील नगर रचना विभाग, मनपा, नपा, सिडको, म्हाडा यांसारख्या विभागातील अधिकार्‍यांना सर्वंकष प्रशिक्षण कार्यक्रम कोकण(ठाणे) तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी नगररचना विभागामार्फत घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दि 11 डिसेंम्बर रोजी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व गृहनिर्माण विभागाचे मंत्री डॉ  जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या सभागृहामध्ये पार पडले. या प्रसंगी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव  शेंडे, राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक श्री सुधाकर नांगनुरे,  ठाणे मनपा चे आयुक्त डॉ वर्मा, चखऊउ चे चीफ प्लँनर लांडगे, क्रेडाई संस्थेचे अजय अशर, गारोडिया हे व्यासपीठावर उपस्थित होते.  तसेच चचठ क्षेत्रातील सर्व मनपा चे आयुक्त सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी नियमावली तयार करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या संचालक सुधाकर नांगनुरे, सहसंचालक प्रकाश भुक्ते, अविनाश पाटील, सुनील मरळे, संजय सावजी या अधिकार्‍यांचा क्रेडाई संस्थेमार्फत स्मरणचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.