ये रे श्रीरंगा!!

मीरा के बोल

बरेच दिवस झाले
पहिले नाही तुला
व्याकूळ होऊन मन माझे
घाली साध तुझ्या मना
दर्शन दे हे श्रीरंगा....

जाणते मी तु नसतोस
तरी वाटे आसपास असतोस
तुझाच भास तुझाच आभास
घेऊन गेलास सोबती तु माझा श्वास
दर्शन दे हे श्रीरंगा....

गेलास कुठे कधी निघून
ठाऊक नसे मजला
प्रेमा खातर तुझ्या
ओलांडला मी राधेचा ही उंबरठा
पुरे झाले भेट आता श्रीरंगा...

आतुर होती तीही
भेटायला तुला
नयन तिचे भिरभिरती
शोधायला तुला
वाट पाहते राधा म्हणुन तरी
ये रे श्रीरंगा...

पाहत असशील दुरून
हा गोंधळ सारा
प्रीतीचा वाहत असे
गोड गुलाबी वारा
भेट तीला ही, पण मला आधी
मन सोडून आले तीच्या अंगणी
ये रे आता श्रीरंगा..

मीरा पितळे