फितूर मन

अवेळी आलेल्या पावसाने 
अंग सारे भिजून गेले
आणि .. 
तुझ्या सोबत घालवलेल्या क्षणांनी  
मनही ओलं चिंब झाले
हद्यातल्या कप्प्यात दडलेल्या आठवणी
हळूच बाहेर आल्या 
दोन नयनांच्या पापण्यांवर 
त्याही अलगद विसावल्या...
दाटलेल्या ढंगाना पावसाने मोकळे केले
आणि
तूझ्या आठवणीने
स्तब्ध माझ्या मनाला फितूर केले ..
मोना विलास सणस