स्पेअर्स पार्ट विकण्यासाठी मोटार सायकलची चोरी

12 मोटारसायकल हस्तगत ; गुन्हे शाखा कक्ष 2 नेे केले आरोपीला गजाआड

पनवेल : पनवेल परिसरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातून विशेष पथके तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 च्या वतीने 12 मोटार सायकल चोरी करणार्‍या संबंधित आरोपीला पकडण्यात आले आहे. सदर आरोपी मोटार सायकलचे स्पेअर्स पार्ट विकण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पनवेल गुन्हे कक्ष शाखा 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कराड, सहापो संदीप गायकवाड, सहापो प्रवीण फडतरे व पोलीस पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी सदर आरोपी आकाश राजेश कहार हा संशयित सापडला. त्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने कळंबोली पतीसरातून मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे 12 चोरीच्या मोटारसायकल असा अंदाजे 5, 77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याने 10 मोटार वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर आरोपी वेगवेगळ्या ठिकाणाहुन मोटार सायकल चोरी करुन वेगवेगळ्या ठिकाणी पार्कींग करीत असे. तो मोटार सायकलचे स्पेअर्स पार्ट विकण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चोरी करत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, सदरचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश कराड, सहापो संदीप गायकवाड, सहापो प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरिक्षक वैभव कुमार रोंगे, पोलीस हवालदार सुनील साळुंके, अनिल पाटील, सचिन पवार, रणजित पाटील, तुकाराम सूर्यवंशी, मधुकर गडगे, पोलीस नाईक सुनील कुदळे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, सचिन म्हात्रे, प्रफुल मोरे, पोलीस शिपाई संजय पाटील, अजिनाथ फुंदे यांनी केलेली आहे.